E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
राजस्तान रॉयल्सचा रोमहर्षक विजय
Vikrant kulkarni
21 May 2025
नवी दिल्ली : राजस्तान रॉयल्सने आयपीएलमधील अखेरच्या सामन्यात विजय मिळवत आपल्या मोहिमेचा शेवट गोड केला. राजस्तानने २ षटके बाकी ठेवत ६ फलंदाज राखून चेन्नई सुपर किंग्स संघावर विजय मिळवला. या सामन्याआधी राजस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. ध्रुव जुरेलने आपल्या षटकारांच्या जोरावर संघाला अखेरीस विजय मिळवून दिला.
या हंगामात राजस्तानचा हा चौथा विजय आहे. हे दोन्ही संघ आधीच आयपीएलमधून बाहेर पडले आहेत. आणि गुणतालिकेत तळाशी आहेत. त्यामुळे या सामन्याचा निकाल प्लेऑफच्या शर्यतीवर परिणाम करणार नाही. पण गुणतालिकेत दोन्ही संघाच्या प्रतिष्ठेचा मात्र प्रश्न होता. चेन्नई सुपर किंग्सने दिलेल्या १८८ धावांचा पाठलाग करताना राजस्तानची सुरुवात चांगली झाली. यशस्वी जैस्वालने १९ चेंडूत १८९.४७ च्या स्ट्राईक रेटने ३६ धावा केल्या. ज्यामध्ये ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. तर वैभव सूर्यवंशीने संथ सुरूवातीनंतर ३३ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५७ धावा करत सामना एकतर्फी जिंकला. दुसरीकडे, कर्णधार संजू सॅमसनने ४१ धावांचे योगदान दिले. त्यानंतर ध्रुव जुरेलने १२ चेंडूत नाबाद ३१ धावा करत राजस्तानला विजय मिळवून दिला. राजस्तानने संपूर्ण सामन्यात उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत चेन्नई संघावर दबाव कायम ठेवला. या सामन्यात राजस्तान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, हा निर्णय संघाच्या पथ्यावर पडला. चेन्नईने फक्त १२ धावांत २ बळी गमावल्या. यानंतर, आयुष म्हात्रेने वादळी खेळी खेळली आणि पॉवरप्लेमध्ये वेगाने धावा केल्या. पण राजस्तानच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन केले.
आयुष म्हात्रेने २० चेंडूत ८ चौकार आणि १ षटकारासह ४३ धावा केल्या. त्याने २१५ च्या स्ट्राईक रेटने धावा करत संघाचा चांगली सुरूवात करून दिली. यानंतर, डेवाल्ड ब्रेव्हिसने २५ चेंडूत ४२ धावा केल्या आणि संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेले. शिवम दुबेनेही ३९ धावा केल्या, ज्यामुळे चेन्नईचा संघ २० षटकांत ८ गडी गमावून १८७ धावा करू शकला.
संक्षिप्त धावफलक : राजस्तान रॉयल्स : वैभव सुर्यवंशी ५७, यशस्वी जैस्वाल ३६, संजू सॅमसन ४१, रियान पराग ३, ध्रुव ज्युरेल ३१, शिमरॉन हॅटमायर नाबाद १२, अवांतर ८, एकूण: १७.१ षटकांत १८८/४
चेन्नई : आयुष म्हात्रे ४३, कॉन्वे १०, डेल्वाड ब्रेविस ४२, दुबे ३९, अश्विन १३, धोनी १६, अनशुल कंबोज नाबाद ५, नूर अहमद २, अवांतर १६, एकूण २० षटकांत १८७/८
Related
Articles
घटस्फोटाच्या दहा वर्षानंतर मिळणार पत्नीसह मुलीला थकीत पोटगी
04 Jun 2025
अमरनाथ यात्रेकरुंना सुविधा पुरविणार
31 May 2025
सात्विक-चिरागचा विजय; सिंधूचा पराभव
06 Jun 2025
इस्रायल सैनिकांच्या गोळीबारात २७ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू
03 Jun 2025
एमबीए प्रत्यक्ष प्रवेश लवकरच सुरू होणार
31 May 2025
तुर्की भूकंपाने हादरला;एका बालकाचा मृत्यू
03 Jun 2025
घटस्फोटाच्या दहा वर्षानंतर मिळणार पत्नीसह मुलीला थकीत पोटगी
04 Jun 2025
अमरनाथ यात्रेकरुंना सुविधा पुरविणार
31 May 2025
सात्विक-चिरागचा विजय; सिंधूचा पराभव
06 Jun 2025
इस्रायल सैनिकांच्या गोळीबारात २७ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू
03 Jun 2025
एमबीए प्रत्यक्ष प्रवेश लवकरच सुरू होणार
31 May 2025
तुर्की भूकंपाने हादरला;एका बालकाचा मृत्यू
03 Jun 2025
घटस्फोटाच्या दहा वर्षानंतर मिळणार पत्नीसह मुलीला थकीत पोटगी
04 Jun 2025
अमरनाथ यात्रेकरुंना सुविधा पुरविणार
31 May 2025
सात्विक-चिरागचा विजय; सिंधूचा पराभव
06 Jun 2025
इस्रायल सैनिकांच्या गोळीबारात २७ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू
03 Jun 2025
एमबीए प्रत्यक्ष प्रवेश लवकरच सुरू होणार
31 May 2025
तुर्की भूकंपाने हादरला;एका बालकाचा मृत्यू
03 Jun 2025
घटस्फोटाच्या दहा वर्षानंतर मिळणार पत्नीसह मुलीला थकीत पोटगी
04 Jun 2025
अमरनाथ यात्रेकरुंना सुविधा पुरविणार
31 May 2025
सात्विक-चिरागचा विजय; सिंधूचा पराभव
06 Jun 2025
इस्रायल सैनिकांच्या गोळीबारात २७ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू
03 Jun 2025
एमबीए प्रत्यक्ष प्रवेश लवकरच सुरू होणार
31 May 2025
तुर्की भूकंपाने हादरला;एका बालकाचा मृत्यू
03 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर